मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर – विश्वजीत राणे

पणजी – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे उपचारांना प्रतिसाद देत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी माध्यमांना दिली आहे.

दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना शनिवारी रात्री पुन्हा एकदा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर जीआय एन्डोस्कोपी करुन 48 तास देखरेखीखाली ठेवले जाणार आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून काल कळविण्यात आले होते.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोमेकाॅत येथे भेट घेऊन आढावा घेतला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, पर्रिकर यांच्यावर उपचार करण्यासाठी दिल्ली येथील एम्स रूग्णालयातील पथक सांयकाळी गोमेकाॅत येथे दाखल झाले. डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या उपचारांना मुख्यमंत्री पर्रिकर हे प्रतिसाद देत असून त्यांची तब्येत आता स्थिर आहे. उद्या त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. काळजी करण्यासारखे काहीच नाही. मनोहर पर्रिकर अॅक्टिव्ह आणि अलर्टही आहेत. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका.

 

Leave A Reply

Your email address will not be published.