करण जोहरच्या पार्टीत कोणत्याही सेलिब्रिटींनी ड्रग्स सेवन केले नव्हते, असे म्हणत करण जोहरला काही दिवसापूर्वीच क्लीन चीट देण्यात आली आहे. मात्र पुन्हा एकदा करण करण जोहर आणि धर्मा प्रोडक्शन ही कंपनी सध्या नेहमीच काही ना काही वादात सापडली आहे.
Dharma Productions will get a notice for a fine from the Goa Waste Management office. Goa is a beautiful state & people come here for shooting films. Everyone is welcome to come & shoot but take your trash away & don’t leave it here: Michael Lobo, Goa Waste Management Minister pic.twitter.com/78y7By7cqc
— ANI (@ANI) October 28, 2020
मिळलेल्या माहितीनुसार, गोव्यातील नेरुळ या छोट्याशा गावात करण जोहरच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. या चित्रीकरणानंतर त्याठिकाणी प्लास्टिक कचरा आणि वापरलेल्या पीपीई किट गावातील परिसरात फेकून देण्यात आल्या होत्या. याबाबत, गोव्याचे वेस्ट मॅनेजमेंट मंत्री मायकल लोबो यांनी प्रकरणात लक्ष घालत कारवाईचे आदेश दिले आहे.
मायकल लोबो म्हणाले की, ‘धर्मा प्रोडक्शनच्या मालकाने या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. त्याचबरोबर गोव्यातील लोकांची माफी मागावी. जर त्यांनी तसे केले नाही तर, आम्ही त्यांना दंड भरण्यास सांगू.’ याघटनेमुळे स्थानिक रहिवाश्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे.