शाळांच्या समस्या जलदगतीने सोडवण्यासाठी मोबाईल ‘अॅप’

पणजी: गोव्यामध्ये असणाऱ्या सरकारी शाळांसाठी एक चांगली बातमी आहे. गोवा सरकार शाळेच्या इमारतींमध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांचे तात्काळ निवारण करण्यासाठी एक स्मार्टफोन आधारित अॅपलीकेशन तयार करत आहे. खास शिक्षकांसाठी तयार करण्यात आलेल्या या अॅपलीकेशन द्वारे शिक्षक गळणारी छते, काम न करणाऱ्या नळांच्या तोट्या, स्वच्छतागृहे इत्यादींबाबत थेट शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल करू शकणार आहेत. आलेल्या तक्रारींचे ४८ तासांच्या आतमध्ये निवारण केले जाईल अशी खात्री देखील सरकार मार्फत देण्यात आली आहे. याबाबत बलताना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत सांगितले की “राज्यसरकारने गेल्या ५ वर्षांमध्ये ६८ कोटी रुपये इतका निधी शाळा इमारतींवर खर्च केला आहे. राज्यसरकार अजूनदेखील ग्रामीण भागांमध्ये शाळांसाठी इमारती बांधू इच्छिते मात्र ठेकेदार ग्रामीण भागांमध्ये काम करण्यास तयार नसल्याने राज्यसरकार पर्यायी मार्ग शोधत आहे,” असे म्हणाले. यावेळी बोलता त्यांनी शिक्षकांसाठीच्या अॅपलीकेशन बाबत देखील माहिती दिली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)