मनोहर पर्रिकर अनंतात विलीन

पणजी – मनोहर पर्रिकर यांचे प्रदीर्घ आजारानंतर वयाच्या 63 व्या वर्षी रविवारी संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमाराला निधन झाले होते. गेल्या वर्षभरापासून स्वादूपिंडाच्या कर्करोगाने पर्रिकर आजारी होते. पर्रिकरांच्या पार्थिवावर आज (सोमवारी) सायंकाळी 6 च्या सुमारास शासकीय इतमामात पणजीतील मिरामार बीचवर अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात पर्रिकरांना अखेरचा निरोप यावेळी देण्यात आला. अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो लोकांसह अनेक राजकीय नेते देखील अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

तत्पूर्वी, सकाळी 9.30 ते 11 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव पणजीतील भाजपच्या मुख्य कार्यालयात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर पर्रिकरांचे पार्थिव अत्यंदर्शनासाठी गोवा कला अकादमी येथे ठेवण्यात आले होते. सांयकाळी 5.30 च्या सुमारास मिरामार बीचवर त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला. त्यानंतर 6 च्या दरम्यान पर्रिकरांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला,

आपल्या लाडक्या नेत्याचं अंतदर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुपारी 2.30 च्या सुमारास त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी पर्रिकर कुटुंबियांचं सांत्वनही केलं. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन ,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते.

त्यांच्या निधनामुळे सोमवारी देशात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.