मनोहर पर्रिकर यांना रूग्णालयातून डिस्चार्ज

नवी दिल्ली – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मनोहर पर्रिकर यांना शनिवारी (23 फेब्रुवारी) रोजी उपचारासाठी गोव्यातील मेडिकल काॅलेजच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, सोमवारी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले होते की, डाॅक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या उपचारांना मुख्यमंत्री पर्रिकर हे प्रतिसाद देत असून त्यांची तब्येत  स्थिर आहे. मंगळवारी त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. काळजी करण्यासारखे काहीच नाही. मनोहर पर्रिकर अॅक्टिव्ह आणि अलर्टही आहेत. कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)