खाडीत कार बुडून भीषण अपघात ! पुण्यातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडेसह मित्राचा मृत्यू

पुणे – मित्राबरोबर गोव्यात फिरायला गेलेल्या पुण्यातील नवोदित अभिनेत्री आणि तिच्या मित्राचा गोव्यात मोटार अपघातात सोमवारी सकाळी मृत्यू झाला. उत्तर गोव्यातील अरपोरा  खाडीत मोटार कोसळल्यानंतर दोघांचा बुडून मृत्यू झाला.

नवोदित अभिनेत्री ईश्वरी देशपांडे (वय २५, रा. पाषाण-सूस रस्ता) आणि तिचा मित्र शुभम देडगे (वय २८, रा. किरकिटवाडी, सिंहगड रस्ता) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. इश्वरी आणि तिचा मित्र शुभम गोव्यात फिरायला गेले होते. सोमवारी (२० सप्ेटंबर) पहाटे साडेपाचच्या सुमारास दोघेजण मोटारीतून अरपोरा खाडीजवळून निघाले होते. त्या वेळी मोटारचालक शुभमचे नियंत्रण सुटले आणि मोटार खाडीत कोसळली.

मोटार खाडीतील पाण्यात पडली. मोटारीत पाणी शिरले. त्यांना मोटारीचा दरवाजा उघडता आला नाही. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांचे बाहेर काढले.  ईश्वरी देशपांडेने एका चित्रपटात काम केले होते. मॉडेलिंग क्षेत्रात तिने काम केले होते. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.