नवी दिल्ली : सीबीआय आणि कोलकात्याचे पोलीस आयुक्त यांच्यामधील वादावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे मुख्यन्यायाधीश रंजन गोगोई यांनी राजीव कुमार यांना चौकशीसाठी एखाद्या तटस्थ ठिकाणी उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत या सीबीआयच्या विनंतीवर निकाल देताना विनोद करत वातावरण हलके केले.
मुख्यन्यायाधीश रंजन गोगोई सीबीआयची विनंती स्वीकारताना म्हणाले की, “सीबीआय आणि कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांनी चौकशीसाठी शिलॉंग येथे भेटावे, तेथील वातावरण थंड असल्याने दोन्ही बाजू शांत राहतील.”
मुख्यन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील न्यायाधीश दीपक गुप्ता आणि न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने आज या प्रकरणामध्ये सुनावणी करताना, कोलकात्याच्या पोलीस आयुक्त राजीव शर्मा यांना सारधा चिट फंड घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी शिलॉंग येथे सीबीआयपुढे हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा