नवी दिल्ली – आधीच आर्थिक संकटात असलेल्या गो फर्स्ट या एअरलाइन्सने पुन्हा एकदा 30 मे पर्यंत त्यांच्या सर्व विमानांचे उड्डाण रद्द केले आहे. तसेच कंपनीने प्रवाशांना त्यांचा परतावा लवकरात लवकर परत करण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
गो फर्स्टने ही माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन दिली आहे. काही ऑपरेशनल कारणांमुळे विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. तसेच प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल कंपनीकडून दिलगीरी देखील व्यक्त करण्यात आली आहे.
डीजीसीएने फर्स्ट एअरलाइन्सकडे कार्यरत असणाऱ्या त्यांच्या सर्व विमानांची माहिती मागितली आहे. तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांविषयी देखील गो फर्स्टने लवकरात लवकर माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी गो फर्स्टने त्यांची 30 मे पर्यंतची सर्व विमानं रद्द करण्याची घोषणा केली.