‘गो करोना…’ : रामदास आठवले पुन्हा सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई – जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसने आता महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. पुण्यात काल दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मात्र, कोरोनाविरोधात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चक्क घोषणा दिल्या. आठवले यांनी भारत-चीन संबंध सुदृढ राहोत असे म्हणत ‘गो करोना… गो… गो करोना… गो’ अशा घोषणा दिल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


या व्हिडिओमध्ये आठवले चक्क करोना विषाणूला भारतामधून परत जाण्यासाठी घोषणाबाजी करताना दिसले. यावरुनच अनेकांनी आता आठवलेंना ट्रोल केलं आहे. पाहूयात याच “Go Corona… Go Corona” संदर्भात व्हायरल झालेले मिम्स आणि ट्विटस…

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.