मुंबई: चीनमध्ये पसरलेल्या नोव्हल कोरोनाव्हायरसच्या उद्रेकामुळे सध्या उद्भवलेली परिस्थिती पाहता गोएअर 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत सिंगापूर, बॅंकॉक व फुकेतला ये-जा करणाऱ्या विमानसेवांसाठी कॅन्सलेशन व रिशेड्युलिंग शुल्कावर पूर्ण सूट देत आहे. गोएअरमध्ये बुकिंग केलेल्या प्रवाशांसाठी ही ऑफर लागू आहे.
ग्राहकांना कोणत्याही शुल्काशिवाय बुकिंग रद्द करण्याचा किंवा केवळ पुन्हा बुकिंग केलेल्या दरामधील बदल (असल्यास) भरत नंतरच्या तारखेचे पुन्हा बुकिंग करण्याचा पर्याय आहे. 29 फेब्रुवारी 2020 पूर्वी परदेशात प्रवास केलेले, तसेच फेब्रुवारी नंतर परतीचे तिकिट बुक केलेले प्रवासी देखील या ऑफरसाठी पात्र आहेत.
प्रवाशांना एअरलाइन वेबसाइट www.goair.inला भेट देण्याची किंवा आमच्या कस्टमर केअर टीमला 18602100999 या क्रमांकावर संपर्क साधण्याची विनंती करण्यात येत आहे.