लंडन – शांतचित्त म्हणून जगात प्रसिद्ध असलेला महेंद्रसिंग धोनी सध्या तो वापरत असलेल्या ग्लोजमुळे चर्चेत आहे. भारताच्या प्रादेशिक सेनेचे बोधचिन्ह असलेले ग्लोज तो वापरत असून त्याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आक्षेप घेतला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) व्यवस्थापन समितीचे मुख्य विनोद राय यांनी याबाबत आयसीसीकडे परवानगी मागितली आहे. मात्र, आयसीसीने बीसीसीआयची ही मागणी फेटाळून लावली आहेत. यावरून अनेक तर्क-वितर्क लढविले जात असून सर्वांच्या नजरा आता रविवारी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया सामान्याकडे लागल्या आहेत. या सामन्यावेळीच धोनी ग्लोज घालणार कि नाही हे स्पष्ट होणार आहे.
आयसीसीच्या नियमानुसार धोनीला ग्लोज न घालण्याबात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी आयसीसीने धोनीला दोन पर्यायही दिले आहेत. पहिला धोनीने ते ग्लोज न घालता दुसरे वापरावे अथवा ग्लोजवरील त्या चिन्हावर चिकटपट्टी लावावी. दरम्यान, भाजप नेता सुब्रहमण्यम स्वामी आणि फुटबॉलपटू सुनील छेत्री यांनी देशांच्या हितासाठी धोनीला आयसीसीसीचे नियम मान्य करण्याची विनंती केली आहे.
परंतु, देशाकरिता प्रतिष्ठेचा भाग असल्यामुळे हेच ग्लोज वापरण्यावर धोनी हा ठाम आहे. असे केल्यास धोनीला पहिल्यांदा आयसीसीकडून चेतावणी दिली जाईल. यानंतरही त्याने ते ग्लोज घातल्यास धोनीला सामन्याच्या फिसचा २५ टक्के रकमेचा भाग आर्थिक दंड आकारण्यात येईल. नंतर ५० टक्के तरीही न ऐकल्यास ७५ टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्यात येईल.