करोना योद्‌ध्यांचा राजगुरूनगरात गौरव

राजगुरुनगर -करोनाच्या संसर्गाच्या धोक्‍याचा संभव असूनही आपल्या जीवाची परवा न करता राजगुरूनगर शहर व खेड तालुक्‍यात उपाय योजना राबविणाऱ्या योद्‌ध्यांचा लायन्स क्‍लब राजगुरूनगर शाखेच्या वतीने नुकताच गौरव करण्यात आला.

खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, चांडोली ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दीपक मुंढे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश गोरे यांचा करोना वॉरियर्स म्हणून सन्मान करण्यात आला. राजगुरुनगर नगरपरिषदेचे कर्मचारी कैलास सांडभोर यांनी करोना लढ्यात केलेल्या विशेष कामगिरी बद्द त्यांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती भगवान पोखरकर, नगरसेवक शंकर राक्षे, क्‍लबचे अध्यक्ष कृणाल रावळ, मिलिंद आहेर, सचिव अंबर वाळुंज, खजिनदार नितीन दोंदेकर, अमित टाकळकर, इम्रान मोमीन, रमेश बोऱ्हाडे, डॉ. सागर गुगलिया, डॉ. विजय आंबरे, मनीष बोरा, विजय घोरपडे हे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.