पुणे – ग्लोबल टेंडरचा फुगा फुटला

- लसीकरणाच्या नावाखाली राजकारण नको - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांना सुनावले

पुणे : लसीकरणाच्या नावाखाली राज्यशासनाला बदनाम करून राजकारण करू नये असा सज्जड दम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी भरला. महापालिकेस लस खरेदी करण्यासाठी राज्यशासनाच्या कोणत्याही परवनगीची गरज नाही. असे स्पष्ट करत सभागृह नेते गणेश बिडकर यांचा दावा खोडून काढला.

पुणेकरांच्या लसीला राजकीय बाधा

दरम्यान, या प्रकरणी शासनावर आरोप करणाऱ्या बीडकर यांनी पुणेकरांची माफी मागावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली आहे. तर आपण मागणी केल्यानंतरच उपमुख्यमंत्री पवार यांनी ही बाब स्पष्ट केली असून तातडीनं टेंडर काढण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले असल्याचा दावा सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केला आहे.

तर बिडकर यांचा दावा थेट आता महापौर मुरलीधर मोहोळ यांनीच खोडून काढला असून महापालिकेस लस खरेदीसाठी शासनाच्या कोणत्याही परवानगीची आवश्यकता नव्हती. हे स्पष्ट असल्याने चार दिवसा पूर्वीच ही निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याचे प्रभातशी बोलताना स्पष्ट केले. तसेच या बाबत शासनाकडे परवानगी मागण्याची कोणतीही गरजच नव्हती असेही स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.