पुणे – साहित्यप्रेमींचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुण्यभूषण फाउंडेशनच्या वतीने भारताबाहेर “ग्लोबल पुलोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. नोव्हेंबर 2018 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत पाच खंडांतील सुमारे 13 ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. चंद्रकांत काळे, गिरीश कुलकर्णी, विनय कोपरकर, संदीप खरे, वंदन नगरकर आदींनी पुलोत्सवात सादरीकरण केले.
एप्रिल महिन्यांत झुरिच, नेदरलॅंड, फ्रांकफूर्ट (जर्मनी), सिडनी (ऑस्ट्रेलिया), सिंगापूर, मॉरिशस, शांघाय येथे कार्यक्रम सादर झाला. तर मे महिन्यांत म्युनिक (जर्मनी), डेन्मार्क, पॅरिस (फ्रान्स) येथे, जून महिन्यात जेरूसलेम (इस्रायल), जुलै महिन्यात डल्लास-बीएमएम कन्वेन्शन (नॉर्थ अमेरिका), ऑक्टोबर महिन्यात ओमान (आशिया) येथे सादरीकरण झाले. जगातील महाराष्ट्र मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद देत “ग्लोबल पुलोत्सव’चे आयोजन केले होते. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी झुरीच आणि पॅरिस येथे भेट दिली, असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.