बॉलीवूडमधील किंग खान अर्थात शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने भलेही चित्रपटसृष्टीत डेब्यू केलेले नाही. परंतु तिची फॅन फॉलोइंग कोणत्याही स्टार कलाकारापेक्षा कमी नाही.
या फोटोंमध्ये सुहानाने खुपच दिलखेचक अंदाजात पोज दिल्या आहेत. बेडवर बसून दिलेल्या पोजमध्ये सुहाना खुपच सुंदर दिसतेय. यात सुहानाने प्रिंटेड ड्रेसमध्ये केस मोकळे सोडलेले आहेत.
सुहानाने या फोटोंमध्ये ऑलिव्हग्रीन बॉडिकॉन ड्रेस परिधान केला आहे. तिच्या यातील अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे
हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, “हे फोटो मी पोस्ट करत आहे, कारण ते पाहता-पाहता मी त्याचा तिरस्कार करायला लागेल.’ या फोटोंवर चाहत्यांनी लाखोंच्या संख्येने कमेंट करत आहेत.
दरम्यान, सुहाना खान ही आपल्या ग्लॅमरस स्टाइल आणि ड्रेसिंग सेंससाठी चाहत्यांमध्ये ओळखली जाते. सुहाना अमेरिकेत शिक्षण घेत होती, परंतु करोना व्हायरसमुळे लॉकडाउन सुरू असल्याने ती सध्या कुटुंबीयांसह मुंबईत आहे.
वडिलांप्रमाणेच सुहानाही बॉलीवूडमध्ये करियर करू इच्छिते. पण सुहानाने शिक्षण पूर्ण केल्यानंतरच चित्रपट जगतात पाउल ठेवावे, असे शाहरुख खानचे मत आहे.