मालदिवचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन मोदींचा गौरव

माले, (मालदिव): पंतप्रधानपदी फेरनिवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांचा पहिला विदेश दौरा असलेल्या मालदिवमध्ये आज दाखल झाले. दरम्यान त्यांना मालदिवचा सर्वोच्च नागरी सन्मान “रुल ऑफ निशान इझुद्दीन’ने गौरवण्यात आले. नरेंद्र मोदी म्हणाले, आज मला मालदीवच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे, हे मी नम्रपणे स्वीकारतो. हा केवळ सन्मानच नसून आपल्या दोन देशांच्या मैत्री आणि संबंधांना आदर दिला जात आहे.

“शेजारी प्रथम’ या आपल्या धोरणाला अनुसरून शेजारील मालदिवबरोबरचे द्विपक्षीय संबंध अधिक बळकट करण्यावर मोदी विशेष भर देणार आहेत. पंतप्रधान मोदी यांचे मालदिवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी राजधानी मालेच्या विमानतळवर स्वागत केले. अध्यक्ष सोलिह यांनी रिपब्लिक स्क्‍वेअरमध्ये पंतप्रधानांचे विधीपूर्वक स्वागत केले.

मालदीवनंतर उद्या नरेंद्र मोदी श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या देशाला भेट देणारे ते पहिलेच राष्ट्रप्रमुख ठरतील.शेजाऱ्यांना प्राधान्य देण्याचं भारताचं धोरण आहे. या धोरणाच्या बळकटीसाठी हे दौरे महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.