शिलाटणे येथे अजगराला जीवनदान; “ट्युमर’चे झाले ऑपरेशन

Madhuvan

कार्ला – मावळ तालुक्‍यातील शिलाटणे येथील डोंगरात जखमी अवस्थेत असलेल्या बारा फुटी अजगराला वन्यजीवरक्षक सदस्यांच्या मदतीने जीवदान मिळाले आहे.

शिलाटणे येथील डोंगरात गुराखी मंडळी आपल्या गाय-बैल यांना चरण्यासाठी गेले असता त्यांना हा अजगर जखमी अवस्थेत असलेला दिसला. त्यांनी गावातील वन्यजीवरक्षक संकेत भानुसघरे यांना कळवले, त्यांनी लगेचच जाऊन त्याला पाहिले त्याच्या तोंडाखाली जखम झाली आहे.

त्या अजगराला खाली गावात घेऊन आले. याबाबत आपले वन्यजीवरक्षक सहकाऱ्यांना कळवले, त्यांनी वनविभागशी संपर्क साधल्यानंतर लोणावळा येथील सुनील गायकवाड व शिवदुर्गच्या रुग्णवाहिकेने पुणे येथे उपचारासाठी दाखल केले असता त्याला “ट्युमर’ झाला, असे कळाले त्याचे दुसऱ्या दिवशी त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली असून, अजगराची प्रकृती सुस्थितीत आहे.

वन्यजीवरक्षक संकेत भानुसघरे, संभाजी भानुसघरे, शिवदुर्ग टीम लोणावळा व वन्यजीवरक्षक सदस्यांच्या तत्परतेने या अजगराला जीवदान मिळाल्याने सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.