आज ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन..
दिव्यांग व्यक्तींबाबत सर्वसामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी, दिव्यांग बांधवांचा सन्मान व्हावा, त्यांचे शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन करण्यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी. या उद्देशाने दिव्यांग दिन साजरा केला जातो
गेल्या २५ वर्षांपासून समाजातील विकलांगांसाठी भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र हे काम करत आहेत. भारत विकास परिषदेच्या विकलांग केंद्राच्या वतीने दिव्यांगांना अत्याधुनिक कृत्रिम मोड्युलर पाय आणि हात व कॅलिपर मोफत दिले जातात या संस्थेच्या देशभरात 1300 पेक्षा जास्त शाखा आहेत.
आज जागतिक दिव्यांग दिनाच औचित्य साधत पुण्यातील भारत विकास परिषदेच्या विकलांग केंद्राचे प्रमुख विनय खटावकर यांच्याशी डिजिटल प्रभातने साधलेला हा संवाद..