वेंगसरकरांचे नाव वानखेडे स्टॅण्डला द्या – मेमन

मुंबई – मुंबईसह देशाच्या संघातून आफलातून कामगिरी करत आपली कारकीर्द गाजवणाऱ्या माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचे नाव वानखेडे स्टेडियममधील एका स्टॅण्डला द्यावे, अशी मागणी मुंबई क्रिकेट संघटनेच्या अपेक्‍स समितीचे सदस्य नदीम मेमन यांनी केली आहे.

ज्या खेळाडूने राज्यासह देशाच्या संघाचेही नेतृत्व केले, संपूर्ण कारकिर्दीत चमकदार कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले, त्यांचे नाव वानखेडेवरील नॉर्थ ब्लॉकमधील एका स्टॅण्डला देऊन सन्मान केला जावा, अशी मागणी मेमन यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.