सीटी स्कॅनचा लाभ गरजू रुग्णांना द्या- उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती/ जळोची -शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सिटी स्कॅन सुविधेचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना व्हावा आणि रुग्णांना ऊत्तम आरोग्य सुविधा द्याव्यात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

“डॉक्‍टर फॉर यू’ आणि उद्योग संस्थांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून 1 कोटी 75 लाख खर्चून बसविलेल्या सीटी स्कॅन मशीनचे लोकापर्ण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, “डॉक्‍टरर्स फॉर यू’ चे अध्यक्ष डॉ. रजत जैन, सचिव साकेत झा, बोइंग इंडियाच्या प्रवीणा भट, इंडिया लिड हेल्थ ऍण्ड वेलनेस वॉलमार्ट ग्लोबल सोर्सिंगचे हेमंत अग्रहारी, फ्लिपकार्टचे संचालक डिप्पी वानकंज,

स्टॅडर्ड चार्टड बॅंकचे सहसंचालक संदीप खाडे, मेंटॉर्स फाऊंडेशनचे डॉ. संतोष भोसले, सीओओ कॅटरपिलर, सी. के. बिर्ला ग्रुपचे तन्मय मुजुमदार, विप्रो अँड जीई हेल्थ केअरचे राजीव कौशिक आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, सिटी स्कॅन यंत्रासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करावी. वैद्यकीय महाविद्यालयात ओपीडी सुरु करण्यासाठी संबंधितांनी कार्यवाही करावी. प्रत्येक जिल्ह्यात एक तरी वैद्यकीय महाविद्यालय असणे आवश्‍यक असून त्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

यावेळी पवार यांनी आयसीयू युनिट, बालउपचार कक्षाची पाहणी केली. 20 ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर व 20 व्हेंटिलेटरचे लोकार्पण केले. व्यायामशाळेचे उद्‌घाटनही पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रभारी अधिष्ठाता यशवंत कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल शिेदे, प्रा. डॉ. राजेश उमाप, विभागप्रमुख डॉ. उदय राजपूत, डॉ. राहुल मस्तूद, सहायक प्रा. डॉ. सौरभ मुथा उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.