कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता. शिरूर) ग्रामस्थांनी एकत्र येत सलग तीन पंचवार्षिक पंचायत समितीपद मिळवले यामध्ये दोनवेळा उपसभापती तर एकदा सभापतीपद मिळवले आहे. यावेळी सणसवाडी ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करत जिल्हा परिषदेचे तिकीट सणसवाडी गावाला द्या, आम्ही सर्वजण एकत्र येत जिल्हा परिषदेत गावचा सदस्य पाठवू, अशी मागणी ऍड. विजय राज दरेकर यांनी केली.
सणसवाडी (ता. शिरूर) ग्रामपंचायतीच्या हद्दीत 5 कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभ मोठ्या उत्साहात आमदार अशोक पवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. त्यावेळी ऍड. विजय दरेकर यांनी शिरूर-हवेली आमदार ऍड. अशोक पवार यांच्याकडे केली.
याप्रसंगी शिरूर पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, जिल्हा परिषद सदस्य कुसूम मांढरे, शिक्रापूरचे पोलीस पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, माजी पंचायात समिती सदस्या सविता दरेकर, श्यिरूर मार्केट समिटीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर, खरेदी-विक्री संघ अध्यक्ष राजेंद्र नरवडे, सरपंच सुनंदा नवनाथ दरेकर, उपसरपंच ऍड. विजयराज दरेकर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दरेकर, दत्तात्रय हरगुडे, सागर दरेकर, नवनाथ हरगुडे, अक्षय कानडे, राहुल हरगुडे, रामदास दरेकर, शशिकला सातपुते, स्नेहल भुजबळ, रुपाली दरेकर, संगीता हरगुडे, सुवर्णा रामदास दरेकर, ललिता दरेकर, दिपाली हरगुडे, प्रियंका दरेकर, ग्रामसेवक बाळनाथ पवणे, गोरक्ष भुजबळ, रमन दरेकर, संभाजी साठे, अण्णासाहेब दरेकर, बाबासाहेब साठे आणि ग्रामस्थ उपस्थितीत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार अशोक पवार यांना आकर्षक फेटा बांधण्यात आला त्यावेळी आमदार अशी पवार यांना राजेश भुजबळ व स्नेहल भुजबळ यांच्यातर्फे विठ्ठल रुक्मिणी मूर्ती भेट दिली तर ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार पवार यांचे स्केच केलेले रंगीत चित्र व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा अनोखा सन्मान करण्यात आला.
यावेळी पाहुण्यांचे स्वागत भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांचे माती, पंख आणि आकाश हे पुस्तक भेट देत गावच्या प्रगतीची उत्तुंग भरारी साधण्यासाठी सर्वजण एक आहोत व लवकरच आमच्या गावातील अधिकारी होतील ही अशा ठेवत पुस्तक भेटी मागील संदेश देत मान्यवरांचे स्वागत अनोख्या पद्धतीने करण्यात आले.
विकासकामांची गंगा
सणसवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय नूतनीकरण, नरेश्वर मंदिर सुशोभीकरण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, अभ्यासिका वाचनालय या बहुउद्देशीय इमारत, स्मशानभूमी परिसर सुधारणा अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण, एलईडी स्ट्रीट लाईट, अंतर्गत ड्रेनेज लाइन, अंगणवाडी इमारत बांधकाम, प्राथमिक शाळा वर्ग खोल्या बांधणे, पाणीपुरवठा सुविधा, प्राथमिक आरोग्य आणि लसीकरण इमारत सुधारणा आदी विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन पार पडले.
बैलगाडा शर्यती सुरू झाल्यावर पहिली स्पर्धा अशोक पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्त भरव्यात येतील.
– दत्तात्रय हरगुडे, माजी संचालक, मार्केट कमिटी, शिरूर
महिलांना आग्रहाने सामाजिक कार्यात पुढे येण्यासाठी आमदार अशोक पवार प्रोत्साहन देत आहेत. शरद पवार यांचा वारसा सक्षमतेने चालवत आहे. बोलून दाखवण्यापेक्षा कृती करून दाखवणे हे आमदार पवार यांच्याकडून प्रत्यक्ष कृतीतून शिकले न थकता काम करणे, प्रत्येक काम दर्जेदार, उत्कृष्टरित्या पार पाडणे, लोकांच्या सेवेसाठी सतत कार्यरत राहण्यासाठी तत्पर असणे, कामाची गुणवत्ता राखणे हे कृतियुक्त शिकलो.
– मोनिका हरगुडे, सभापती, शिरूर पंचायत समिती
सणसवाडी गाव हे सर्वांगीण विकासाच्या बाबतीत अग्रेसर असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करोना लसीकरण आणि नागरिकांच्या जीविताची काळजी घेतली आहे.गावासाठी आणखी एक पाण्याची टाकी, नागरिकांच्या रोग्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व सणसवाडी चौकात स्वागत कमान यांची मागणी केली.
– सुनंदा दरेकर, सरपंच तथा परिषद महिला जिल्हाध्यक्षा
अँम्यूनिटी जागा, आरोग्य केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, जागा मिळालेल्या आरोग्य केंद्र आणि पाण्याची टाकी उभारण्यासाठी मदत करणार आहे. पीएमआरडीएच्या चुकीच्या रस्त्याबांबत आणि इतर झोन बाबत पाठपुरावा करण्यास प्राधान्य देणार आहे. शिरूर तहसील कार्यालयात मोजणी कार्यालयाकडे लक्ष देणार असून चुकीचे काम करणाऱ्यांवर कार्यवाही केली जाणार आहे.
– अशोक पवार, आमदार, शिरूर-हवेली