विधानसभेची नेवाळे यांना उमेदवारी द्या

ग्रामीण पदाधिकारी, कार्यकर्त्यांची एकमुखी मागणी

वडगाव मावळ – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांना मावळ विधानसभेची उमेदवारी देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. वडगाव येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात गुरुवारी (दि. 25) आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांनी उमेदवारीची मागणी लावून धरली.

या वेळी राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, श्‍यामराव पाळेकर, प्रवीण झेंडे, अमीन शेख, दिलीप खळदे, सूर्यकांत काळोखे, दीपक हुलावळे, नामदेव ठुले, प्रकाश पवार, दत्तात्रय शेवाळे, साहेबराव कारके, कुसुम काशीकर, गंगा कोकरे, अतिश परदेशी, राजश्री राऊत, मंजुश्री वाघ, शुभांगी राक्षे, छबुराव कडू, पंढरीनाथ ढोरे, सुनील ढोरे, शिवाजी आसवले, ज्ञानेश्‍वर गोणते, प्रकाश हगवणे, कृष्णा परंडवाल, रमेश गायकवाड आदींसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षाने अद्यापही ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला विधानसभेची उमेदवारी दिलेली नाही. सतत शहरी भागातच उमेदवारी दिल्याने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही. नेवाळे यांनी गोवित्रीचे सरपंच ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे व पुणे जिल्हा दुध संघाचे संचालक म्हणून ग्रामीण भागातील नागरिक व कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन केले आहे. प्रास्ताविक अमोल केदारी यांनी केले. सूत्रसंचालन किरण हुलावळे यांनी केले. रमेश गायकवाड यांनी आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)