नगर – राज्यात महाविकास आघाडीला अतिशय चांगले वातावरण असून लोकसभेप्रमाणे विधानसभेतही महाविकास आघाडीचा झेंडा विधानसभेवर फडकेल. त्यामुळे नगर शहरात चैतन्याचे वातावरण असून श्रीगोंद्यातही कार्यकर्त्यांना वेगळा हुरूपआला आहे. काँग्रेस कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत. त्यामुळे नगर शहर आणि श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने काँग्रेसला सोडावी, असे साकडे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरचंद्र पवार यांना घातले.
यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष संपत म्हस्के, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके, बाबासाहेब गुंजाळ आदींसह कार्यकर्त्ये उपस्थित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेना तिनही पक्षाने एकत्र येऊन राज्यात लोकसभेत जोरदार करिष्मा करून दाखवला. शरदचंद्र पवार आणि राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी दिवसरात्र एक केला. आणि एक एक उमेदवार निवडून आणला. भाजप आणि मित्र पक्षांचे पानिपत झाले.
काँग्रेस पक्षाचा नगर जिल्हा एकेकाळी बालेकिल्ला होता. आता नगर जिल्ह्यात खासदारकीच्या दोन्ही जागा महाविकास आघाडीने मिळवल्या. आपले दोन्ही उमेदवार जायंट किलर ठरले. यामुळे नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना त्यात विशेषतः काँग्रेसला उभारी मिळाली आहे. नगर उत्तरेत तर काँग्रेस पक्ष श्रीरामपूर, संगमनेर, सोबत आणखी चारही मतदारसंघात सरस ठरेल. आणि दक्षिणेत काँग्रेस पक्षाला नगर आणि श्रीगोंदा या जागा मिळाल्या तर या मतदारसंघातही काँग्रेसला खाते उघडता येईल.
श्रीगोंदा येथील ज्येष्ठ नेतृत्व घनश्याम शेलार यांनी राज्य पातळीवर काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या नेतृत्व गुणाचा फायदा पक्षाला चांगल्या प्रकारे होतो आहे. त्यामुळे या दोन्ही जागांचा आपण प्राधान्याने विचार करून काँग्रेसला मिळवून द्याव्यात, अशी विनंती पवार यांना करण्यात आली.
शरद पवार यांनी या प्रस्तावाला संमती देत आपण काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रभारी आणि पक्ष श्रेष्ठी यांच्याशी चर्चा करू. नगर जिल्ह्याची घट्ट असे नाते आहे. यशवंतराव चव्हाण व्यासपीठाच्या रूपाने नगरमध्ये त्यांचे विचार आणि कार्य पुढे नेण्याचा संकल्प आपण पूर्ण करतो आहोत. यावेळी चर्चा करताना पवार यांनी नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
शहरात शिवसेना उबाठा गटाची भरभक्कम साथ महाविकास आघाडीला आहे. तेथे शिवसेना इतर मित्र पक्षापेक्षा मजबूत स्थितीत आहे. याचा आढावा शरद पवार यांनी घेतला. नगर शहर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार दिल्यास कसे राहील याची विचारणा देखील त्यांनी केली. नगर शहराची जागा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस ऐवजी सेनेला सोडण्याच्या विचारात असल्याचे चर्चेतून दिसले.