पुणे – जगभरात प्रेम व्यक्त करण्यासाठी “व्हॅलेंटाईन डे’ मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. विशेषत: तरूणाईकडून यानिमित्ताने “स्पेशल सेलिब्रेशन’ करण्यात येते. याचनिमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुडलक चौक ते साखर संकुलपर्यंत प्रेम यात्रा काढली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन ‘प्रेम द्या, प्रेम घ्या’ असा संदेश दिला आहे.