‘ड्रीम सिटी प्रकल्प ‘म्हाडा’कडे द्या, डीएसके ठेवीदारांना पैसे परत मिळावेत’

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निवेदन

पुणे – डीएसके ड्रीम सिटी प्रकल्प “म्हाडा’तर्फे विकसित करुन ठेवीदारांच्या ठेवी परत कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. ही मागणी ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. चंद्रकांत बिडकर, ऍड. दिपक गिरमे, ऍड. सुनील कुलकर्णी व संजय गवळी यांनी केली आहे.

ऍड. बिडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएसके कंपनीवरील फौजदारी गुन्ह्यात 32 हजार गुंतवणूकदारांची 11 हजार कोटींची फसवणूक झालेली आहे. यामुळे स्वत: शरद पवार यांनी लक्ष घालून गुंतवणूकदारांची परतफेड करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी.

फुरसुंगी येथील 300 एकरावरील प्रकल्प ताब्यात घेऊन म्हाडातर्फे विकसित करण्याचे आदेश द्यावेत. ऍड. चंद्रकांत बिडकर यांनी ठेवीदारांतर्फे 50 फौजदारी याचिका दाखल केल्या आहेत. त्यामध्ये राज्य सरकार, म्हाडाचे मुख्य अधिकारी, डी. एस.कुलकर्णी, पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, मुलगी अश्‍विनी देशपांडे, मेहुणी अनुराधा पुरंदरे व मुलगा अमित यांना प्रतिवादी केले आहे.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना सरकारतर्फे वकिलामार्फत 300 एकर जमिनीवरील डीएसके ड्रीम सिटी प्रकल्प घेण्याबाबत संमंती दर्शवली व तसे “ऍफिडेव्हिट इन रिप्लाय’ सादर केले, तर उच्च न्यायालय तसे आदेश पारित करू शकेल व 32 हजार गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळतील, असेही या निवेदनात म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.