डेटाला द्या ऑनलाइन संरक्षण

जगदीश काळे 

काम करताना किंवा अन्य कारणावरून अचानक आपला हार्ड ड्राईव्ह क्रॅश होऊ शकतो तर कधी लॅपटॉप चोरीला जाऊ शकतो. अशावेळी त्यात काही महत्त्वाचा डेटा असेल तर तो देखील त्याबरोबरच जाण्याचा धोका असतो; परंतु आपल्याला जर डेटा सुरक्षित ठेवायचा असेल तर ऑनलाईनच्या माध्यमातून त्याला संरक्षण देऊ शकतो. यासाठी काही संकेतस्थळ उपलब्ध असून ही संकेतस्थळ आपला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी मदतगार सिद्ध होऊ शकतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अड्राइव्ह डॉट कॉम: या संकेतस्थळावर आपण खासगी वापरासाठी 50 जीबीपर्यंतचा डेटा स्टोर करू शकतो. डेटा स्टोर करण्यासाठी जेव्हा आपण संकेतस्थळावर जाऊ तेव्हा साईनअप करणे गरजेचे आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे व्हेरिफिकेशन होते. हे संकेतस्थळ वेबइंटरफेस लोड करते आणि त्यात आपली फाईल स्टोर केल्यानंतर ती फाईल आपण पाहू शकतो तसेच एडीटही करू शकतो. हे संकेतस्थळ सर्व प्लॅटफॉर्मवर काम करू शकते. मात्र, यासाठी जावाची आवश्‍यकता आहे. फाईल मॅनेजर विंडोतून आपण आपली अपलोड फाईल कोठूनही सर्च करू शकता. हे संकेतस्थळ आपल्याला फाईल्सची एक बॅच एकाचवेळी डाऊनलोड आणि अपलोड करण्याची सुविधा देतो. हे संकेतस्थळ विंडोज, मॅक, लायनेक्‍ससाठी डेस्कटॉप क्‍लाइंटची सुविधा प्रदान करते.

ड्रॉप बॉक्‍स डॉट कॉम: ड्रॉप बॉक्‍स हा डेस्कटॉप क्‍लाइंटच नाही तर आयफोन, आयपॅड, अँड्राइड आणि ब्लॅकबेरी डिव्हाईसच्या मदतीने डेटा सुरक्षित ठेवण्याची सुविधा देते. हा फ्री ऍप असून त्यात डाऊनलोड करून मोबाइल डिव्हाईसच्या माध्यमातून फाईल पाहू शकता आणि शेअर करू शकता. ड्रॉपबॉक्‍स हे मोफतपणे केवळ दोन जीबीचे स्टोरेज करण्याची सुविधा प्रदान करते.

डेस्कटॉप क्‍लाइंटसारखे विंडोज, मॅक, लायनेक्‍सशिवाय कठीण असलेल्या ऑपरेटिंग सिस्टिमबरोबर देखील इंटिग्रेट होतो. पीसीत असलेल्या ड्रॉपबॉक्‍स फोल्डरचे सर्व फाईल्स आपोआप अपडेट होतात. यासाठी ब्राऊजर ओपन करण्याची गरज नाही. या माध्यमातून सर्च, ड्रॅग, ड्रॉप होण्याबरोबरच अपडेटेशन देखील होते.

बॉक्‍स डॉट कॉम: बॉक्‍सच्या मदतीने आपण पाच ते 50 जीबीपर्यंत डेटा ऑनलाईन स्टोअर करू शकता. मात्र, आपण साईनअप कशा पद्धतीने करता यावर स्टोअरेज अवलंबून आहे. डेस्कटॉप साईनअप केल्याने आपण पाच जीबीपर्यत डेटा स्टोर करू शकता. मात्र, आयपॅडच्या मदतीने 50 जीबीपर्यंत डेटा स्टोर करता येतो. बॉक्‍स क्‍लाइंटला विंडोज किंवा मॅकमध्ये फाईल सिनक्रोनाईज करण्याची सुविधा देत नाही. त्याचवेळी अँड्राइड फोन्स, टॅबलेट, आयफोन, आयपॅड, आयपॅड, ब्लॅकबेरी फोन्स, प्लेबुक टॅबलेटसाठी ऍपची सुविधा प्रदान करते. मोबाइल ऍपचा वापर करून कंटेट अपलोड किंवा ई-मेलच्या माध्यमातून शेअर करता येतो.

संकेतस्थळावर आधारित फाइल मॅनेजरच्या मदतीने पर्सनल कॉम्प्युटरमधून फाईल्स ड्रॅग किंवा ड्रॉपशिवाय फोल्डर क्रिएट करू शकता आणि गूगल डॉक्‍सचा वापर करून वर्ल्ड किंवा एक्‍सल डॉक्‍युमेंटमध्ये क्रिएट करू शकता. यात एकच उणीव अशी की, जर आपल्याला विशेष फाईल शोधायची असेल तर आपण ती स्वतंत्रपणे शोधू शकत नाही. जर डेटा ऑनलाइन विश्‍वात सुरक्षित ठेवायचा असेल तर आपण या संकेतस्थळाची मदत घेऊ शकता. त्याचा वापर करून आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

बॅडऑनगो डॉट कॉम: हे संकेतस्थळ मोफतपणे आपल्याला अनलिमिटेड स्टोरेजची सुविधा प्रदान करते. फ्री यूजर्स डेटा 500 केबीपीएसच्या स्पीडने 4.8 जीबीपर्यंत डाऊनलोड करू शकता. ही सेवा आपण कोणत्याही पद्धतीने वापरू शकतो. फाइलच्या आकाराच्या आधारावर त्याला पाहता येऊ शकते. जर एखाद्या विशिष्ट टाईपचा ऑडिओ किंवा व्हिडिओ ऐकायचा असेल तर सर्व फाईल पाहण्याची आवश्‍यकता नाही.

वेब फाइल मॅनेजर फोल्डर क्रिएट करून ब्राऊजरच्या मदतीने मल्टीपल फाईल्स अपलोड करण्याची सुविधा प्रदान करते. त्याचवेळी डेस्कटॉप फाईल मॅनेजरच्या माध्यमातून आपण फाइल्स किंवा फोल्डरला ड्रॅग किंवा ड्रॉप करू शकता. या संकेतस्थळावर आपण फाइल्सला सर्च, क्‍यू, डाऊनलोड किंवा शेअर करू शकता. एकाचवेळी अनेक अकाऊंटचा वापर करू शकता. अनेक फाईल आपण डाऊनलोड करत असाल तर वेब इंटरफेसमध्ये त्याचे स्टेटेस्टिक्‍स दाखवते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)