Maratha Reservation | मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण केले. ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या मागणीवर अद्यापही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत, मात्र दुसरीकडे ओबीसी समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला मोठा विरोध होत आहे.
मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आंदोलन सुरू
आता मुंबईत मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, याबाबत सगळ्या राजकीय पक्षांची भूमिका जाणून घेण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आंदोलन सुरू आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक रमेश केरे पाटील मुंबईत ‘जबाब दो’ आंदोलन करणार आहेत. Maratha Reservation |
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याजवळ हे आंदोलन केले जाणार आहे. आंदोलक रमेश केरे पाटील आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापासून ते शरद पवार यांच्या निवासस्थानापर्यंत आंदोलन करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला ते शरद पवार यांचा सिल्व्हर ओक बंगला असा मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी या दोन्ही नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडावी, असे मत व्यक्त केले आहे. Maratha Reservation |
देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन होत असल्याने मुंबईच्या मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेट्स टाकण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा:
शेअर बाजाराची दमदार सुरुवात ; सेन्सेक्स 950 अंकांनी तर मिडकॅप 1000 अंकांनी वधारला