पिरंगुट- भूगाव (ता. मुळशी) येथे ग्रामस्वछता अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत व क्रिसील फाउंडेशन यांच्या संयुक्तविद्यमाने प्लॅस्टिकमुक्त भूगाव करण्यासाठी “प्लॅस्टिक द्या अन् कापडी पिशवी व तांदुळ न्या’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांकडून घरातील व इतर ठिकाणचे सुमारे 450 किलो प्लॅस्टिक जमा झाले. प्लॅस्टिक जमा करणाऱ्या विद्यार्थ्याला कापडी पिशवी व एक किलो तांदूळ देण्यात आले.
यावेळी सरपंच निकीता सणस, उपसरपंच अनिकेत शेडगे, स्वस्तिक चोंधे, मुख्यध्यापक लव गायकवाड, भास्कर गायकवाड, बाळासाहेब बडदे, सतीश इंगवले, विशाल भिलारे, अक्षय सातपुते, राहुल कांबळे, अर्चना सुर्वे, वैशाली सणस, वैशाली चोंधे, पार्वती शेडगे, माजी सरपंच भगवान सणस, वसंत शेडगे, सोपान सुर्वे, नरेश चोंधे, निवृत्ती शेडगे, गुलाब चोंधे,बाळकृष्ण सुर्वे, दिपक करंजावणे, कुणाल गुप्ता, कमल आगरवाल, रोनक जैन, स्वप्निल भोसले, सुमित मिश्राम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वांनी संकल्प घेऊन दुकानातून खरेदीसाठी स्वतःची पिशवी घेऊन जाऊन विक्रेत्यांना प्लॅस्टिक पिशवीचा वापर बंद करण्याचे सांगितले.