बारामती तालुक्‍यात मुलीच “नंबर वन’ 

बारामती – बारामती शहर व तालुक्‍यातील दहावीच्या परीक्षेचा एकूण निकाल 84.35 टक्‍के लागला आहे. 2018-19 साठी बारामती तालुक्‍यातून एकूण 7 हजार 415 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते, त्यापैकी 6 हजार 732 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याचप्रमाणे शहर व तालुक्‍यात मुलींनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. बारामती तालुक्‍यातून 3 हजार 843 मुलांपैकी 3 हजार 308, तर 3 हजार 572 मुलींपैकी 3 हजार 424 मुलींनी परिक्षेत यश संपादन केले.

शाळांचा निकाल (टक्‍के) पुढीलप्रमाणे; तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय (87.37), छत्रपती शाहू हायस्कूल (94.16), एमईएस हायस्कूल (80.95), एमईएस उच्च माध्यमिक (100), कारभारी अन्ना सातव विद्यालय (96.47), विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय (91.82), शारदाबाई पवार विद्यालय शारदानगर (98.99), मयुरेश्‍वर विद्यालय मोरगाव (86.48), नवमहाराष्ट्र विद्यालय (94.42), कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय सांगवी (60), सोमेश्‍वर विद्यालय सोमेश्‍वरनगर (99.53), उत्कर्ष विद्यालय वाघळवाडी (84.28), शंभूसिंह महाराज विद्यालय माळेगाव (50.80), कृषी उद्योग शिक्षणसंस्था काऱ्हाटी (85.18), एसव्हीएम विद्यालय पणदरे (98.95), शारदाबाई पवार विद्यानिकेतन माळेगाव (99.56), सिद्धेश्‍वर विद्यालय (92.70), चैतन्य इंटरनॅशनल स्कूल मेडद (99.64), अभिननव इंटरनॅशनल स्कूल (100), आरएन आग्रवाल हास्कूल बारामती (98.80).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.