प्रियकराकडून तरुणीच्या मामेभावाची हत्या 

नागपूर – एकतर्फी प्रेमातून एका प्रियकराने तरुणीच्या आतेभावाची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. राहुल तुर्केल आपल्या प्रेमात अडसर ठरत असल्याच्या गैरसमजातून आरोपीने त्याची निर्घृण हत्या केली.

आरोपी रिचेश सिकलवार याचे राहुलच्या मामे बहिणीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र रिचेशची वागणूक पाहून राहुलची बहीण आणि तिचे कुटुंबीय रिचेशला पसंत करत नव्हते. वर्षभरापूर्वी तरुणीच्या कुटुंबीयांनी म्हणजेच राहुलच्या मामाने तिचे लग्न जमवले होते. यामुळे आपला मित्र राहुलनेच प्रेमसंबंधांत अडसर आणल्याचा रिचेशचा समज झाला होता.

त्यानंतर रविवारी सकाळी पूर्ण नियोजन करुन तो राहुलच्या घरी पोहचला. माझा आज वाढदिवस असून आपण पार्टी करु, असे सांगून तो राहुलला घेऊन गेला. त्याला मनसोक्त दारु पाजून स्वतःच्याच घरात त्याची हत्या केली. त्यानंतर घरात कुलूप लावून तो फरार झाला. दरम्यान, घटनास्थळी कुंकू आणि इतर पूजा साहित्य आढळल्याने या हत्येमागे अंधश्रद्धेचा असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)