अहमदाबाद : बॉयफ्रेंडने खासगी व्हिडिओ लीक केल्याने अहमदाबादमधील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
अहमदाबादमधील छारानगर भागात ही घटना घडली. व्हिडिओ लीक झाल्याने अल्पवयीन मुलगी प्रचंड मानसिक तणावाखाली होती. यामुळे तिने सोमवारी गळफास घेतला.
बॉयफ्रेंडने हा खासगी व्हिडिओ आपल्या तीन मित्रांना पाठवला. या मित्रांकडून हा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर मुलीच्या वडिलांनी तिच्या बलात्काराची तक्रार दाखल केली होती.
मुलीने आणि तिच्या बॉयफ्रेंडने परस्परांच्या संमतीने हा व्हिडिओ शूट केला होता.मुलीच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी तिच्या बॉयफ्रेंडविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
तसंच लैंगिक अत्याचार प्रकरणी त्याच्यावर पोक्सो कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल झालाय. तर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या त्याच्या तीन मित्रांविरोधातही माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आल्याचं पोलीस म्हणाले.