पारोळा – झोक्याची फाशी लागून 2 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना (म्हसवे ता. पारोळा) येथे घडली आहे. वेदू नितीन पाटील असे चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 2 वर्षाची चिमुकली वेदू ला तिच्या आईने झोपी घालण्यासाठी झोक्यात टाकले होते. झोक्यातून खाली पडू नये म्हणून त्यांनी तिला रूमालाने बांधले होते. त्या रूमालाचीच फाशी बसून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जेव्हा आई वेदूला झोक्यातून बाहेर काढण्यासाठी गेली असता तिची हालचाल बंद झालेली होती. तिला डाॅक्टरांकडे नेले असता डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.