मुंबई – चुकून टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्यामुळे मुलीच्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुबईतील धारावी परिसरात घडली. अफसाना खान (वय 18) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफसाना हिने सकाळी झोपेतून उठल्यानंतर चुकून टूथपेस्ट ऐवजी उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासले. टूथपेस्टची चव नसल्याचे लगेच तिच्या लक्षात आले, तातडीने तीने चूळ भरली मात्र तोपर्यंत शरिरात विष पसरले होते. भोवळ येऊन ती खाली कोसळली. त्यानंतर तीला जेजे रूग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस उपचार सुरु होते. मात्र दोन दिवसांच्या उपचारानंतर अफसानाचा रविवारी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अफसानाच्या कुटुंबात आई, मोठी बहिण, दोन लहान भाऊ असा परिवार आहे.
पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच किटकनाशके आणि जावाला धोका पोहचविणाऱ्या वस्तू मुलांच्या सहज हाती लागतील अशा ठिकाणी न ठेवण्याचे आवाहन केले आहे.