नवी दिल्ली – भारतीय जतना पक्षाचे खासदार गिरीश बापट यांनी गुढीपाडव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देतना बापट यांनी देशातली महागाई कमी होवो अशी प्रार्थना देखील केली आहे. देशात महागाईने सर्व सामान्याचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल-डिझेलसह जीवनावश्यक वस्तू्ंच्या किंमतीत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भाजप सरकारच्या काळात महागाईने डोके वर काढले आहे आणि त्यांचेच नेते महागाई कमी व्हावी यासाठी प्रार्थना करताना दिसून येत आहेत.
शुभेच्छा देताना बापट म्हणाले, आज पहिल्यांदाच पुणे सोडून दिल्लीमध्ये पाडवा साजरा करत आहे. आज खूप आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, आजच्या गुढीपाडव्याच्या मंगलमय दिवशी एक संकल्पही केला पाहिजे की, सध्या देशाची परिस्थिती, आता देशातील महागाई, कोरोना संकट या सगळ्या पीडा निघून जावोत.
मोदींच्या नेतृत्वाखाली जगाचे नेतृत्व करणाऱ्या भारत देशाची पुन्हा गती होवो. ही स्फूर्ती गुढीपाडव्याच्या निमित्ताने येते. गुढी उभारणे म्हणजे संकल्प उभारणं आहे. संकल्प आणि सिद्धी यांच्यामधील अंतर प्रयत्नाने पूर्ण करायचं असते. मी माझ्या महाराष्ट्रातील तमाम बांधवांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत आहे. अशा शुभेच्छा बापट यांनी आज दिल्या आहेत.