संसदेच्या अंदाज समिती अध्यक्षपदी खासदार गिरीश बापट

पुणे -संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी खासदार गिरीश बापट यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली. लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी त्यांची नियुक्ती केली. या समितीमध्ये लोकसभेमधील 30 सदस्य असणार आहेत.

अंदाजपत्रकातील समाविष्ट बाबींची चिकित्सा, शासन खर्चात काटकसर सुचवून धोरणात आणि प्रशासकीय व्यवस्थेत कार्यक्षमता कशी वाढेल या दृष्टीने मार्गदर्शनपर सूचना करणे यांसारखी कामे या समितीला करावी लागतात. समितीच्या शिफारशी स्वीकारण्याचे लोकसभेला बंधनकारक नसले, तरी समितीच्या सूचना आणि शिफारशी या मार्गदर्शनपर असतात. स्थापनेपासून अनेकदा या समितीने उपयुक्तता सिद्ध केली आहे.

यापूर्वी मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने या समितीत काम केले आहे. धर्मेंद्रकुमार कश्‍यप, मोहनभाई कुंडारिया, दयानिधी मारण, के. मुरलीधरन, एस. एस.पलानीमणीक्कम, कमलेश पासवान, के. सी. पटेल, राजवर्धनसिंग राठोड, विनायक राऊत, अशोककुमार रावत, मागुंटा श्रीनिवासुलू रेड्डी, राजीव प्रताप रुडी, फ्रांसिस्को सरडिन्हा, जुगल किशोर शर्मा, धरमवीर सिंग, संगीता कुमारी सिंग देव, केसीनेनी श्रीनिवास, सुनील तटकरे, प्रवेश साहिब सिंह वर्मा यांचीही या समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.