गिरीराज सिंह यांच्यावरही बनणार सिनेमा

केंद्रीय मंत्री आणि बिहारचे नेते गिरिराज सिंह यांच्यावर एक चित्रपट बनला आहे. या सिनेमाचे पोस्टर देखील रिलीज झाले आहे. “हां हर गरीब-जरुरतमंद की आवाज हूं, हां मै गिरीराज हूं’ असे सिनेमाचे नाव आहे. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याची बऱ्यापैकी चर्चा झाली. फिल्म पोस्टरमध्ये स्वतः गिरिराज सिंह यांच्या तीन प्रतिमाही आहेत.

पोस्टरवर मिळालेल्या माहितीनुसार बिहारमधील बेगुसराय येथील खासदार असलेल्या गिरीराज सिंह यांच्यावरील हा सिनेमा म्हणजे एक शॉर्टफिल्म असणार आहे. दिनकर फिल्म प्रॉडक्‍शनच्यावतीने हा सिनेमा केला जातो आहे. रघुबीर सिंह हे या सिनेमाचे डायरेक्‍शन करत आहेत.

सध्या या शॉर्टफ्ल्मच्या पोस्ट प्रॉडक्‍शनचे काम सुरू आहे. काही तांत्रिक गोष्टींची पूर्तता झाल्यावर लवकरच हा सिनेमा प्रदर्शनासाही तयार होणार आहे. गिरीराज सिंह यांनी लोकसभेच्या निवडणूकीत कन्हैय्या कुमारचा पराभव केला होता.

त्यांच्या अनेक वादग्रस्त वक्‍तव्यांमुळेही ते चर्चेत आले होते. त्यांच्या करिअरचा आढावाच या शॉर्टफिल्ममध्ये घेतलेला असेल. त्याव्यतिरिक्‍त त्यामध्ये मनोरंजनाचा भाग असण्याची शक्‍यता फारच कमी आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.