रोम – इटलीतील सुपर मॉडेल जॉर्जिया एंड्रीयानी आणि बॉलिवूडमधील ऍक्ट्रेस जॉर्जिया एंड्रीयानीने आपल्या खास ग्लॅमरस लुकने आपला एक खास चाहता वर्ग निर्माण केला आहे.
भारतातल्या एंटरटेनमेंट करिअरमध्ये स्थान मिळवलेल्या जॉर्जियाने आता भारतीय भाषाही शिकायला सुरूवात केली आहे. तिने हिंदी आणि पंजाबी बऱ्याच दिवसांपासून शिकायला सुरूवात केली आहे.
आता तिने इंन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये मराठी बोलण्याचा व्हिडीओ अपलोड करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. “कॅन यू स्पीक मराठी ? कॅन आय टेक युवर एक्झाम?’ असे तिला तिच्या मित्राने विचारले. तेंव्हा जॉर्जियाने “माझ परीक्षा काय घेशील? मी तर आगोदरच पास झाले आहे.’ असे अस्खलित मराठीत ऐकवून आश्चर्याचा धक्का दिला.
<
View this post on Instagram
जॉर्जियाने दक्षिणेतील “कॅरोलिन और कामाक्षी’ या वेबसिरीजमध्ये काम करून आपल्या अभिनय करिअरची सुरूवात केली आहे. मीका सिंगच्या “रुप तेरा मस्ताना’ या रिमिक्स अल्बममध्येही तिला बघितले गेले होते.
आता ती लवकरच श्रेयस तळपदेबरोबर “वेलकम टू बजरंगपूर’मध्येही दिसणार आहे. जॉर्जियाकडे आणखीनही काही इंटरेस्टिंग प्रोजेक्ट आहेत. कदाचित त्यात एखादा मराठी सिनेमाही असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.