असा तयार करा आरोग्यदायी आल्याचा चहा

आलं म्हणजेच अद्रक. याचा वापर हा मसाल्यासाठी केला जातो. मात्र, याचे पाणी नेहमी पिल्याने अनेक आजार टाळता येऊ शकतात. यामधील अँटी बॅक्‍टरीअल, अँटीफॅंगल आणी अँटी इन्फ्लामेट्रॅरी घटक शरीराला निरोगी ठेवण्यात मदत करतात. व्हिटॅमिन अ, सी, इ आणि बी कॉम्प्लेक्‍सचा एक उत्तम स्तोत्र म्हणून आलं ओळखलं जात. त्याचबरोबर मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, झिंक, कॅल्शिअम आणि बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात असतात.

1. कर्क रोगापासून बचाव – आल्यामध्ये अँटीकॅन्सर प्रॉपर्टी असतात. याचे पाणी प्यायल्याने प्रोस्टेट, ओवॅरिस, कोलोन, ब्रेस्ट, स्किन कॅन्सरपासून बचाव होतो.

2. छातीतील जळजळ थांबते – जेवण्याच्या 20 मिनिटांनंतर 1 कप आल्याचे पाणी प्यावे. हे शरीरामध्ये ऍसिडचे प्रमाण नियंत्रण करते. यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या दूर होते.

3. पचनक्रिया सुधारते – आल्याचे पाणी शरीरामध्ये पाचक रस वाढावते. यामुळे जेवण लवकर पचते.

4. वजन कमी होते – आल्याचे पाणी प्यायल्याने शरीराचे मेटॅबोलिसम सुधारते. अशावेळी फॅट लवकर जळतात आणि वजन कमी करण्यास मदत मिळते.

5. मधूमेह नियंत्रणात राहतो – नियमित आल्याचे पाणी प्यायल्याने शरीराची ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहते.

6. रोग प्रतिकार शक्ती वाढवायला – आल्याचा चहा शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढ़वाण्यासाठी मदत करतो. ज्यामुळे आपल्याला सर्दी, खोकल्यासारख्या आजारापासून रक्षण होण्यास मदत होते. सर्दीमुळे होण्याऱ्या डोकेदुखीपासून सुटका.

असा तयार करा आल्याचा चहा – आल्याचे साल काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करा किंवा किसून घ्या व उकळून घ्या. पाणी उकळल्यानंतर हे पाणी गाळून घ्या. त्यानंतर त्यामध्ये थोडे लिंबू पिळा. गोड करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये गूळ किंवा मधही मिक्‍स करू शकता. आरोग्यदायी असा आल्याचा चहा तयार.

डॉ. आदिती पानसंबळ आहारतज्ज्ञ, नगर. संपर्क : 7385728886.  

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.