तरौबा (वेस्ट इंडिज) : शुभमन गिलचे विक्रमी द्विशतक व कर्णधार हनुमा विहारीचे तडाखेबाज शतक याच्या जोरावर भारत “अ’ संघास वेस्ट इंडिज “अ’ संघाविरूद्धच्या तिसऱ्या अनधिकृत क्रिकेट कसोटीत आपली बाजू बळकट करता आली.
गिलने प्रथम दर्जाच्या सामन्यात भारताकडून द्विशतक टोलविणारा सर्वात तरूण खेळाडू होण्याचा मान मिळविला. त्याने 248 चेंडूंमध्ये 19 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 204 धावा केल्या.
गिल याच्या द्विशतकाचे कौतुक करीत भारताच्या वरिष्ठ संघाचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले, क्रिकेटच्या सर्व स्वरूपांच्या सामन्यात चमक दाखविण्याची क्षमता गिलकडे आहे. त्याला येथील दौऱ्यात आमच्या संघात स्थान देण्याची आवश्यकता होती. निवड समितीने त्याच्या या कामगिरीची दखल घेतली पाहिजे.