पुणे – करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट येथील पोलिस रुग्णालयाला ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोशिएशनच्या वतीने एक ईसीजी मशीन व दोन वॉट डिस्पेंसर सुपूर्द करण्यात आले. स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांच्या प्रयत्नातून हे साहित्य रुग्णालयास देण्यात आले आहे.
स्वारगेट पोलिस वसाहतीत पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी सेवा देणारे हे पोलिस रुग्णालय आहे. मशीन येथे उपलब्ध झाल्यामुळे त्याचा मोठा फायदा पोलिस व त्यांच्या कुटुंबियांना होणार असल्याचे मत वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास वडगाये यांनी व्यक्त केले. यावेळी गुन्हे निरीक्षक शब्बीर सैय्यद, असोशिएशनचे प्रशांत वाण, विनोद पटोकोटवार आदी उपस्थित होते.