नवदाम्पत्याला पाहुण्यांकडून मिळाले ‘हे’ गिफ्ट अन् मंडपात..;पहा व्हिडीओत काय झालं नेमकं ?

नवी दिल्ली : देशात सध्या इंधन दरवाढ आणि कांदा, सिलेंडरच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तामिळनाडूच्या एका नवविवाहित जोडप्याला त्यांच्या मित्रांनी अनोखं गिफ्ट दिलं आहे. कोणी पेट्रोलचा कॅन, कोणी एक गॅस सिलेंडर तर कोणी कांदे गिफ्ट म्हणून दिले आहेत.

लग्नाच्यावेळी एक अनोखे गिफ्ट मिळवण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पाहुण्यांच्या हातात पेट्रोल, गॅस सिलिंडर आणि कांदे दिसतात गिफ्ट घेऊन सर्वजण एकत्र येऊन स्टेजवर उभे आहेत.

व्हिडिओमध्ये प्रत्येकजण आनंदी दिसत आहे. आपण पाहू शकता की वधू हसत आहे आणि तिचे हसणे थांबविण्याचा प्रयत्न करीत आहे.

व्हिडिओ शेअर करताना वापरकर्त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ”तामिळनाडूमध्ये जोडप्यास लग्नाच्या भेटवस्तूंमध्ये पेट्रोल, गॅस सिलिंडर आणि कांदे मिळाले’. ४५ सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत २ हजाराहून अधिक वेळा पाहिलेला आहे. यासोबतच लोक त्यावर गमतीदार कमेंट्सही देत ​​आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.