चार प्रकल्पांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विजेत्यांना गौरविले
नारायणगाव -जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण जीएमआरटी खोडद येथे आयोजित विज्ञान प्रदर्शानास 24 हजार विज्ञानप्रेमींनी भेट दिली, अशी माहिती एनसीआरए, जीएमआरटीचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी डॉ. जे. के. सोळंकी व जीएमआरटीचे प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे यांनी दिली.
प्रदर्शानात सहभागी विद्यार्थ्यांचे प्रकल्प चार स्तरांमध्ये विभागले होते. विजेते आणि उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. यावेळी परिवहन अधिकारी अनिल पंतोजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरचे वरिष्ठ व्यवस्थापक राजश्री बोथाले, प्रशासकीय अधिकारी व संयोजक डॉ. जे. के. सोळंकी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी अ. भी. जोंधळे, रतिलाल बाबेल, वामन व समिती सदस्य उपस्थित होते.
गट 1- 5 ते 7 वी- प्रथम : आर्यन टकले, तनुष सुर्वे, प्रयोगाचे नाव – रॅक, स्मार्ट पोलीस व्हेईकल, एसपीएमएस सेकंडरी स्कूल, परशुराम, (रत्नागिरी), द्वितीय- रोनक वाधवानी – जेस्चर कंट्रोल्ड रोबोट, स्पायसर स्कूल, पुणे, तृतीय : परी पटेल व स्नेहल हांडे, अक्सिडेंट प्रिव्हेन्शन, स्ट्रॉबेरी स्कूल, आळेफाटा. उत्तेजनार्थ : लावन्या मुसळे, किंजल गोबरे, प्रोजेक्ट बेस्ड ऑन अर्थक्वेक, व्हिजन स्कूल, शिरूर.
गट 2- 8 ते 10 वी- प्रथम- प्रणव सुर्वे व अथर्व लंबे, मल्टीपर्पज कॉम्पेनियन. सुमन विद्यालय, टेरव. द्वितीय : सार्थक पानसरे व हिमेश पंजवानी, स्मार्ट रेल्वे स्टेशन, शंकरराव बुट्टे पाटील स्कूल, जुन्नर, तृतीय : विनल विकांशी व तोरल परासिया (फोटोमीटर युजिंग एलडीआर, अभिनव विद्यालय, डोंबिवली, उत्तेजनार्थ : अपूर्वा बांगर व साक्षी बांगर, ऑप्टीकल बॉक्स, वंडर ऑफ लाईट, श्रीराम विद्यालय, पिंपळगाव (खडकी).
गट 3 – 11 ते 12 वी/ आयटीआय/ डिप्लोमा/बी. एस्सी. प्रथम : विजय फुटाणे, तेजस गुंजाळ, ई-प्लग ऍग्री इक्विप्मेंट, समर्थ पॉलिटेक्निक, बेल्हे, द्वितीय : श्रेयस जेजुरकर, ओमकार गायकवाड, विदाऊट इंजिन एचटीपी. पम्प ऑपरेटिंग, निवृत्तीशेठ शेरकर प्रायव्हेट आयटीआय, निवृत्तीनगर, तृतीय : तुषार शेटे, संदेश खिलारी, ऑटो मोटर स्टार्टर ऍन्ड वॉटर सेव्हर, महात्मा गांधी कॉलेज, मंचर, उत्तेजनार्थ : अभिजित सहाणे, तेजस कार्डीले व ऋत्विक व्हानुरे मल्टीफंक्शनल रोव्हर, शंकरराव बुट्टे पाटील जुन्नर,
गट 4 – बीई/बीटेक/एमई/ एमटेक/ एमएससी, प्रथम : श्रद्धा मोरे व ऋषिकेश जावरे, हार्नेसिंग इलेक्ट्रिकल पॉवर युजिंग हिट एनर्जी जनरेटेड फ्रॉम गॅस टर्बाईन इंजिन, संदीप, युनिव्हर्सिटी, नाशिक, द्वितीय : प्रतीक वाळुंज, ऑटोमॅटिक टर्मिनेशन ऑफ इग्निशन सिस्टीम ऑपरेशन, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिअरिंग ऍन्ड रिसर्च, रावेत, तृतीय : सूरज भोसले व अमोल कलाम, डेव्हलपमेंट ऑफ नॅनो-कॉम्पोसीट बेस्ड सुपरकपॅसिटर ऍन्ड रिझल्ट्स विथ एएनएन, सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कुसगाव, लोणावळा, उत्तेजनार्थ : नमन जोशी व रोहित गुप्ता, सेल्फ ड्रायव्हिंग कार, ठाकूर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कांदिवली, मुंबई.