नाट्यरसिकांसाठी पर्वणी

लोणावळ्यातील भोंडे स्कूलमध्ये उद्यापासून नाट्य स्पर्धेला प्रारंभ
स्पर्धेत जिल्ह्यातील 17 विभागातील 80 नाटिकांचा सहभाग
कार्ला (वार्ताहर) – पुणे जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग आयोजित सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्यस्पर्धा व पु. ल. देशपांडे करंडक लोणावळा येथील ऍडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूल येथे सोमवारपासून (दि. 6) सुरू होणार आहे. 6 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान चालणार आहेत. पुणे जिल्हा नाट्य परिषदेचे हे 50 वे वर्ष असल्याने सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जोरदार तयारी करण्यात आली आहे

लोणावळा येथील भोंडे हायस्कूलला या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे यजमानपद पुणे जिल्हा परिषदेकडून देण्यात आले. या स्पर्धा ही पुणे जिल्हा अंतर्गत असणार आहे. जिल्ह्यातील 17 विभागातील 80 नाटिका या स्पर्धेत सहभागी होणार असून, अंदाजे 1300 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी असल्याचे संयोजक शाळेने सांगितले आहे. परीक्षणासाठी बाहेरून नामांकित परीक्षक येणार असून, नाट्य स्पर्धेत नाट्य क्षेत्रातील व चित्रपट क्षेत्रातील नामांकित व्यक्ती भेट देणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री 8 जानेवारी रोजी येणार असल्याचे सांगण्यात आले. नाट्य स्पर्धेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष व भोंडे हायस्कूलचे रौप्यमहोत्सवी असल्याने ही विद्यालयासाठी सुवर्णसंधी असल्याची संस्थेचे अध्यक्ष माधवराव भोंडे, सचिव राधिका भोंडे यांनी सांगितले.

शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रगती साळवेकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजूम शेख, पर्यवेक्षिका पंकजा काचरे, शिक्षक अमोल साळवे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तालुक्‍यातील सर्व शाळांनी या संधीचा फायदा घेऊन कार्यक्रम पाहण्यास उपस्थित रहावे, असे आवाहन शाळेकडून करण्यात आले आहे.

अगळीवेगळी स्पर्धा
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांच्या व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी पुणे जिल्हा परिषद ही एकमेव जिल्हा परिषद आहे. प्रत्येक तालुक्‍यात एक केंद्र पुणे शहर व हवेली दोन केंद्र असे 17 केंद्रावर स्पर्धा होतात. ते ही मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेत व मुले, मुली या वेगळ्या गटात. तालुक्‍यातील प्रत्येक गटात प्रथम क्रमांक आलेल्या संघाची जिल्हा पातळीवर अंतिम फेरीसाठी निवड होते. अंतिम स्पर्धेसाठी 80 संघ असतात. त्यातून प्रत्येक भाषेत व गटात प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढले जातात. सरासरी एका तालुक्‍यात 30 ते 35 संघ सहभागी होतात. या वर्षी पूर्व हवेलीत 55 संघाचा सहभाग आहे. 5 ते 6 हजार कलाकारांचा सहभाग असेल. त्या एकांकिकांचे दिग्दर्शक, नेपथ्थ आदी शिक्षकांचा सहभाग 65 ते 70 परीक्षक यांचा सहभाग असणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.