गिब्सने आलिया भटला ओळखले नाही

बॉलीवूड आणि क्रिकेट हे नाते काही नवीन नाही. अलिकडेच दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हर्षल गिब्सने अनवधानाने आलिया भट बरोबर ट्विटरवर चॅट सुरू केले. त्यातून मोठीच धमाल झाली.

झाले असे की ट्‌विटरने गिब्जची एक पोस्ट लाईक केली. त्यावर एक “जीआयएफ’ पण शेअर केली. जर ट्‌विटर स्वतःहून एखाद्या पोस्टला लाईक करत असेल, तर कसे वाटते हे दर्शवण्यासाठी आलियाचा फोटो त्या “जीफ’वर होता. मात्र गिब्सने आलियाला ओळखलेच नाही आणि त्यानेही ही पोस्ट शेअर केली. त्यामुळे अर्थातच त्याच्यावर भरमसाठ कॉमेंट पडायला लागल्या. ही मुलगी कोण आहे ?असे लोकांनी त्याला विचारले. त्यावर हर्षल गिब्जने “माहित नाही.’ असे उत्तर दिले. एवढेच नाही, तर ही मुलगी छान असल्यामुळे आपण “जीफ’ शेअर केल्याचे त्याने सांगितले.

बराच वेळाने शेअर केलेल्या “जीफ’ मध्ये असलेली मुलगी म्हणजे बॉलीवूडची चुलबुली गर्ल आलिया भट असल्याचे त्याला समजले. एवढा सगळा गोंधळ सुरू असेपर्यंत आलिया भट्ट गप्प बसून ऑनलाइन तमाशा बघत बसली होती. नंतर तिने ट्‌विटरवर स्वतःच्या व्हिडिओ पोस्ट करून एक खुलासा केला. अंपायर ज्याप्रमाणे “चार रन’ची खूण करतात त्याप्रमाणे खूण करून तिने आपली ओळख सांगितली.

बिचाऱ्या हर्षल गिब्सला आपली चूक उमगली. त्यानेही आपण आलियाला ओळखले नसल्याचे मान्य केले. त्याचबरोबर आलियाच्या खुणेला प्रत्युत्तर देताना “मी चौके मारत नाही. सिक्‍सर मारतो मॅडम’ असे उत्तरही त्यांनी ट्‌विटरवर पोस्ट केले.
या दोघांमधील हा मजेदार संवाद ट्विटरवर सगळे फॅन एन्जॉय करत होते. गिब्सच्या उत्तराची तारीफ सगळेजण करत होते. तर आलियाच्या “जीफ’ लाही खूप लाईक मिळाले. वर्कफ्रंट बाबत बोलायचे तर आलिया जवळ “ब्रम्हास्त्र’, “सडक 2′, “तख्त’ आणि “आरआरआर’ हे सिनेमे आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×