टोकियो – जपानमधील निप्पॉन महोत्सवाला या वेळी ऑलिंपिकची साथ मिळाली आहे. ऑलिंपिक संयोजन समितीने ऑलिंपिक उदघाटन सोहळ्यापूर्वी सहा दिवस आधी या आगळ्या निप्पॉन महोत्सवाचे आयोजन केले असून, यासाठी तब्बल 10 मीटर उंच बाहुली आज टोकियोत दाखल झाली.
ही बाहुली सर्वप्रथम 15 मे रोजी इवाटे भागात दाखवण्यात आली. त्यानंतर 62दिवस तोहोकू क्षेत्रातील तीन शहरांचा दौरा करून अंतिम टप्प्याच्या प्रवासात ती आज टोकियोत दाखल झाली.
या बाहुलीचे ‘मोक्को’नामकरण करण्यात आली असून, महोत्सवाचे ती मध्यावर्ती आकर्षण ठरली आहे. ही बाहुली पूर्णपणे अॅनिमेटेड असून ऑलिंपिक समितीने आयोजित केलेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात ती सहभागी झाली होती. हा कार्यक्रम टोकियो 2020 निप्पॉन महोत्सवाचा एक भाग होता.