नवी दिल्ली – देशात अनेक प्रकारच्या भोगौलीक क्षेत्राची ओळख असलेल्या उत्पादनाची लागवड केली जाते. त्यावर आधारीत हिमाचलीचा काळा जिरा, छत्तीसगढचे जिराफूल आणि ओडिशाचा कंधमाला हाळदी यांच्यासह 14 उत्पादनांना सरकारने या वर्षात आतापर्यंत भौगोलिक सांकेतिक (जीआय) ओळखीचा दर्जा दिला आहे. ही माहिती उद्योग व व्यापार संवर्धन विभागा (डीपीआयआयटी) कडून सादर करण्यात आली.
ज्या राज्यांमध्ये उत्पादनांना सरकारकडून जीआयचा दर्जा दिला आहे. त्यामध्ये कर्नाटकांतील कुर्ग येथील अरेबिका कॉफी व सिरिसी सुपारी, केरळच्या वायनाडमधील रोबस्टा कॉफी, आंध्र प्रदेश येथील अराकू वॅली अरेबिका आणि हिमाचल प्रदेशतील एका तेलाचा समावेश आहे. खास वेगळेपण असणारी ही उत्पादने आहेत. अन्य कोणत्याही प्रकारचे नाव वापरून या उत्पादनांचा वापर करता येणार नाही. एका विशिष्ट क्षेत्रात घेण्यात येणाऱ्या कृषी, उत्पादनांना हा जीआयचा दर्जा सरकारकडून देण्यात येतो.त्यात दार्जिलिंगचा चहा, नागपूरच्या संत्र्यांचा समावेश आहे.