औंढा नागनाथ येथे मारवाडी समाजाच्यावतीने घोषवाक्‍याची गुढी

औढा नागनाथ – अखिल भारतीय मारवाडी महिला औंढा शाखेच्यावतीने मराठी नववर्षानिमित्त वैशिष्ट्यपूर्ण गुढी उभारली. ती गुढी वेगवेगळ्या घोषवाक्‍यांची होती. या गुढीवर घोषवाक्‍य “मुलगा शिकला तर एक घर उजळेल मुलगी शिकली तर दोन घर उजळतील’. “मुलीचे शिक्षण प्रगतीचे लक्षण’. “बेटी बचाव बेटी पढाओ’. “नारीत शक्ती भारी का समजता बिचारी’. “मुलगी झाली म्हणून बाळगू नका भीती गुणवान मुलगी ही तर देशाची संपत्ती’ असे या गुढीवर लिहिण्यात आले होते.

यावेळी त्यांनी महिला सक्षमीकरणाचा ही गुढी उभारून संदेश दिला. या गुढी उभारणी कार्यक्रमास मंजुषा झांझरी . आरती अग्रवाल. शरयू देव .तारा अग्रवाल .नंदा झांझरी. रश्‍मी अग्रवाल .मीना राठी. कल्याणी सोनी. अर्चना सारडा. पद्मा अग्रवाल .पूजा झुनझुनवाला ह्या महिला उपस्थित होत्या.
गुढी ही पारंपारिक पद्धतीची होती त्यामध्ये गुढीला आंब्याची पाने लिंबाचे पाणी व साडी गुंडाळून गुढीची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली या नंतर ही गुढी उभारण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.