9 लाख रुपयांचे तुप जप्त

भेसळीच्या संशयावरून कारवाई

 

पुणे – भेसळीच्या संशयावरून 9 लाख 37 हजार 290 रुपयांचा तुपाचा साठा अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केला. विनालेबलचा तुपाच्या साठा करून ठेवल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांकडून विभागाला मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

प्रशासनातील अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी विनालेबलचे 1,499 किलो वजनाचे 4 लाख 49 हजार 700 रुपये वजनाचे 100 तुपाचे डबे ताब्यात घेतले. चौकशीअंती हवेली तालुक्‍यातील मे. डि.जी.एम. इंडस्ट्रीज, धावडे इंडस्ट्रीयल इस्टेट शिवणे येथून हे तूप खरेदी केल्याची माहिती मिळाली.

अन्न सुरक्षा अधिकारी गणपत कोकणे, राजेंद्र काकडे, अर्चना झांजुर्णे यांच्या पथकाने आणखी सखोल चौकशी करून आणखी 1,023 किलोचा तुपाचा साठा जप्त केला. त्यातून आणखी 4 लाख 87 हजार 590 रुपयांचा साठा जप्त केला.

यासह एकूण 9 लाख 37 हजार 290 रुपयांचे 2,522 किलो तूप जप्त केले.
हे तूप तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून, विश्‍लेषण अहवाल मिळल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.