नवी दिल्ली – बॉलिवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक ‘रेमो डिसूजा’चा गाझियाबाद पोलिसांन कडून पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. रेमो डिसूझाच्या विरोधात सिहानी गेट पोलिस ठाण्यात पाच कोटी रुपयांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रॉपर्टी डीलरने 2016 साली याप्रकरणी तक्रार नोंदवली होती.
View this post on Instagram
काय आहे पाच कोटींचे प्रकरण –
मिळालेल्या माहिती नुसार, सत्येंद्र त्यागी नावाच्या एका व्यक्तीने रेमो डिसूझाच्या विरोधात फसवणूकीची तक्रार दाखल केली. त्यागी यांचा आरोप आहे की 2013 मध्ये त्याची रेमो डिसूझाशी ओळख झाली होती. काही दिवसांनी रेमोने त्याचा चित्रपट ‘अमर मस्ट डाय’मध्ये 5 कोटी रुपये गुंतवण्यास सांगितले होते.
तसेच, रेमोने त्यावेळी ही रक्कम दुपटीने परत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याने मूळ रक्कमही परत केली नाही.
दरम्यान, मी जेव्हा पैशाची मागणी केली त्यावेळी रेमोने मला अंडरवर्ल्डकडून जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी देणाऱ्याने आपले नाव प्रसाद पुजारी सांगितले आहे. तसेच मुंबई मध्ये परत न येण्याची धमकीही दिली. त्यानंतर सत्येंद्र त्यागी यांनी गाझियाबादच्या सिहानीगेट पोलिस स्टेशनमध्ये रेमो डिसूझाच्या विरोधात तक्रार केली.