राज्यात लवकरच विधानसभा निवडणुक लागणार आहे. या निवडणुकांसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे टेंशन वाढवणारी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचे समर्थक आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे यांनी शरद पवार गटाचा प्रवेश करणार आहे. ईश्वर बाळबुद्धे यांनी घरवापसी करणार असल्याने अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.
छगन भुजबळ यांचे समर्थक आणि ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुद्धे शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थित घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम अजित पवार गटाला येत्या विधासभा निवडणुकांमध्ये होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ओबीसींना न्याय मिळत नसल्याची भावना घेऊन ओबीसी पदाधिकारी पवारांच्या गटात परतणार असल्याची माहिती समोर आली आहे.